आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लिम होती ही 108 किलोची अॅक्ट्रेस, आणखी वजन वाढवायला दिला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजली आनंदचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. - Divya Marathi
अंजली आनंदचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
मुंबई - 'ढाई किलो प्रेम' मध्ये दीपिकाची भूमिका करणाऱ्या अॅक्ट्रेस अंजली आनंदचा एक जुना फोटो सध्या मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हा फोटो केव्हाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यात अंजली खूपच स्लिम दिसत आहे. अंजलीचे सध्याचे वजन जवळपास 108 किलो आहे. 

आणखी वजन वाढवण्यास दिला नकार 
- 'ढाई किलो प्रेम'मध्ये अंजली सध्या दीपिकाची भूमिका करत आहे. शोसाठीच तिने 108 किलोपर्यंत वजन वाढवले. पण जेव्हा मेकर्सने तिला आणखी वजन वाढवण्यास सांगितले तेव्हा मात्र तिने नकार दिला. 
- आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंजली म्हणाली, मी माझ्या लाईफमध्ये खूप अॅक्टीव्ह राहिले आहे. ज्यांना ट्रॅक आणि सायकलिंग आवडते त्यांनी एवढे वजन वाढवणे योग्य नाही. मी या भूमिकेसाठी वजन वाढवले आणि सध्या मी 108 किलोची आहे. त्यामुळे आणखी वजन वाढवणे माझ्यासाठी त्रासदायक ठरू शकले असते, त्यामुळे मी नकार दिला. 

भारतात भेटत नाही अंजलीचे कपडे 
- अंजली सांगते, माझी हाईट 6 फूट आहे. वजनही त्यानुसार आहे. त्यामुळे माझ्या मापाचे कपडे आणि बूट येथे मिळत नाही. मला लंडनमधून शॉपिंग करावी लागले. मला टीव्ही पाहायलाही आवडते. मी अनेक तास टीव्ही पाहू शकते. 
- 2013 पासून अंजलीने अॅक्टींग सुरू केली. त्याआधी तिने मॉडेलिंगही केले आहे. 

अशी आहे सिरियलची कथा.. 
- अंजली सांगते, ढाई किलो प्रेमची कथा दोन अशा लोकांवर आधारित आहे, ज्यांचे वजन खूप जास्त आहे. पण जाड असलो म्हणून काय झाले आम्ही कुणापेक्षाही कमी नाही, असे त्यांचे मत असते. लठ्ठपणाचा लाज कशाला वाटायला हवी असे त्यांचे म्हणणे असते. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे अंजलीचा कोस्टार मेहरजान माजदानेही शोसाठी वजन वाढवले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अंजली आनंदचे काही PHOTOS.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...