आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरही निवडणुकांचा कैफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी टीव्हीवरील सपने सुहाने लडकपन के, एक मुठ्ठी आसमान, कुबुल है, तर कलर्स वाहिनीवरील बानी इश्क दा कलमा, स्टार प्लसच्या दिया और बाती अशा सर्व मालिकांतील प्रमुख अभिनेत्री महिलांना मतदानाचा हक्क बजावणे आणि आपणही 49 टक्केमध्ये असल्याने ब्रह्मस्त्र हाती असल्याची जाणीव करून देत आहेत. वास्तव जीवनाप्रमाणेच छोट्या पडद्यावरही निवडणुकांचा कैफ चढला आहे.
प्रचार, जाहिराती, सभा, भाषणे आणि सत्संग अशा विविध स्तरांतून मतदान हक्क बजावण्याविषयी जनजागृती होत आहे. भारतीय उच्चशिक्षित तसेच मध्यमवर्ग निवडणूक, राजकारण यापासून दूर राहतो. त्यातही महिला अतिशयच अनभिज्ञ राहतात. त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि देशाचे नेतृत्व निवडीत भूमिका पार पाडावी यासाठी सर्व बाजूंनी जनमत निवडणुकीसाठी तयार केले जात आहे. शासकीय वाहिनीवरून हे होणे अपेक्षित आहेच मात्र महिला वर्गांच्या आवडत्या मालिका या स्टार प्लस, झी टीव्ही आणि कलर्सवर असल्याने या मालिकांतूनच त्यांना मत देण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे आपल्या क्षेत्रात उभा असलेला उमेदवार कसा आहे याबद्दलची माहिती एक एसएमएस पाठवून जाणून घ्या, असे आवाहनही गेल्या अनेक दिवसांपासून केले जात आहे.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, गुंजनने केलेले आवाहन...