आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्‍जैन, भोपाळख्‍या छोट्या शहरातून आलेले तरुण टीव्‍हीवर झाले हिट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्‍हीच्‍या दुनियेत फक्त मोठ्या शहरातील तरुणांनाच संधी मिळते, अशी आतापर्यंत लोकांमध्‍ये धारणा होती. परंतु, अलिकडच्‍या काळात हा भ्रम मोडीत निघाला आहे. आता उज्‍जैन, भोपाळ, इंदूर, दौसा, भागलपूर, जयपूर यासारख्‍या शहरांमधून मुंबईत गेलेल्‍या तरुणांनी छोट्या पडद्यावर स्‍वतःचे अस्तित्त्व निर्माण केले आहे. हे आम्‍ही नव्‍हे तर छोट्या पडद्यावरील तारे स्‍वतः सांगत आहेत. टीव्‍हीवर प्राईम टाईम शोच्‍या कलाकारांवर एक नजर टाकल्‍यास संपूर्ण चित्र स्‍पष्‍ट होईल. प्राईम टाईमच्‍या प्रत्‍येक शोमध्‍ये असलेले बहुतांश कलाकार कोणत्‍या ना कोणत्‍या लहान शहरातून आलेले आहेत. या शहरांतील तरुणांनी स्‍वतःला सिद्ध केले आहे. ते लहान शहरातून आलेले असले तरी त्‍यांची स्‍वप्‍नं मात्र उंच भरारी घेण्‍याचे आहेत.

टीव्‍हीवरील लोकप्रिय कलाकार गुरमीत चौधरीलाच पाहा. गुरमीतचा जन्‍म चंदीगडला झाला. तो मुळचा बिहारच्‍या भागलपूरचा आहे. त्‍याचे वडील भारतीय सैन्‍यात होते. तो स्‍टार वन वाहिनीवरील 'गीतः हुई सबसे पराई' या मालिकेत सर्वप्रथम दिसला. त्‍याचे चांगले काम पाहून त्‍याला एकपाठोपाठ एक चांगल्‍या ऑफर्स मिळाल्‍या. हळूहळू तो भारतीय टीव्‍हीवरचा एक लोकप्रिय चेहरा बनला. नुकताच तो स्‍टार प्‍लसच्‍या 'नच बलिये-6'मध्‍ये झळकला होता. चांगल्‍या कामासाठी त्‍याला अनेक टीव्‍ही पुरस्‍कारही मिळाले आहेत.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या अशाच कलाकारांबाबत जे लहान शहरातून आले आहेत....