आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day : अॅक्ट्रेसच नव्हे, वेट्रेसही होत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील आदर्श सून ते राजकारणात केंद्रीय मंत्री असा प्रवास पूर्ण करणाऱ्या स्मृती इराणी यांचा आज 39 वा वाढदिवस आहे. तुलसी वीराणी या पात्राद्वारे घराघरांत स्थान मिळवणाऱ्या स्मृती इराणी एकेकाळी मोदींच्या विरोधक होत्या. त्यांनी गोधरा कांडानंतर मोदींवर उघडपणे टीका केली होती. त्यावेळी त्यांनी उपोषणाचा इशारादेखिल दिला होता. पण वेळ झपाट्याने बदलला आणि स्मृती यांचा मोदींबाबतचा दृष्टीकोनही. त्यामुळेच अभिनयाच्या जगातून बाहेर पडत त्या आता केंद्रीय मंत्री बनल्या आहेत.

स्मृती यांचे मॉडेलिंग आणि अभिनयाचे करिअरची चांगलेच संघर्षमय आहे. सुरुवातीच्या काळात झालेली टीका आणि रिजेक्शननंतरही त्यांनी हार मानली नाही. मॅक डॉनल्ड्समध्ये वेटर ते तुलसी वीराणी आणि कॅबिनेट मंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे. प्रत्येक भूमिका त्यांनी योग्यरित्या सांभाळली आहे, मग ती पडद्यावरील असो वा खऱ्या आयुष्यातील.

मिस इंडिया स्पर्धा
पारंपरिक पंजाबी-बंगाली कुटंबातील तीन मुलींपैकी एक असलेल्या स्मृती यांनी सर्व बंधने तोडत ग्लॅमर जगतात पाऊल ठेवले. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेत सहभाग गेतला. त्यांना अंतिम फेरीपर्यंत मात्र पोहोचता आळे नाही. त्यानंतर त्यांनी मुंबईला जात अभिनय जगतामध्ये नशीब आजमावले.

छोड्या पड्यावरील आदर्श सून
मोठ्या संघर्षानंतर एकता कपूरने त्यांना टिव्हीवर सर्वाधिक काळ चाललेल्या मालिकेत 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मध्ये तुलसी वीराणीचे पात्र दिले. त्यानंतर त्यांनी घराघरांत स्थान मिळवले. छोट्या पडद्यावर आदर्श सुनेचे पात्र साकारणाऱ्या स्मृती यांनी जुबिन ईराणी यांच्याशी विवाह केला. त्यांची दोन मुले आहेत. जोहर आणि जोइश अशी त्यांची नावे आहेत.

राजकीय कारकीर्द
स्मृती यांच्या राजकीय करिअरची सुरुवात 2003 मध्ये जाली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यांना चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार कपिल सिब्बल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 च्या निवडणुकांमध्ये स्मृती यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठी मतदारसंघात लढा दिला. त्यांचा पराभव झाला. पण राज्यसभेचे सदस्यत्व देऊन त्यांना मोदी सरकारमध्ये महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्मृती इराणींचे काही PHOTOS