आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते 'कसौटी जिंदगी की' मधली क्यूट स्नेहा, साऊथ इंडस्ट्रीतील आहे फेमस हीरोईन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 2001 मध्ये छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत स्नेहाची भूमिका साकारणारी क्यूट मुलगी आठवतेय का तुम्हाला... आता ही चिमुकली खूप मोठी झाली आहे. मालिकेत स्नेहा बजाजची भूमिका साकारणारी श्रिया शर्मा आता 19 वर्षांची झाली असून दाक्षिणात्य सिनेमांमध्ये लीड अॅक्ट्रेस म्हणून काम करतेय. बालपणी क्यूट दिसणारी श्रिया आता ग्लॅमरस आणि गॉर्जिअस दिसते.

वयाच्या तिस-या वर्षापासून अभिनय करतेय श्रिया...
श्रियाचा जन्म 9 एप्रिल 1997 रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झाला. वयाच्या तिस-या वर्षी श्रियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मालिकांमध्येच नव्हे तर सिनेमांमध्येही श्रियाने बालकलाकार म्हणून काम केले आहे. याशिवाय अनेक जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे.

वडील इंजिनिअर आणि आई आहे डायटीशिअन...
श्रियाचे वडील विकाश शर्मा इंजिनिअर तर आई रितू शर्मा या डायटीशिअन आहेत. श्रियाला इंडस्ट्रीत काम करुन आता 15 वर्षे झाली आहेत. 'थोडा प्यार थोडा मॅजिक', 'चिल्लर पार्टी' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. सध्या ती तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्रिया शर्माचे खास फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...