आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sofia Hayat Boycotts Grand Finale Of Bigg Boss 7

अरमानला लवकर जामीन मिळाल्याने सोफिया नाराज, BIGG BOSS FINALE मध्ये उपस्थित न राहण्याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअलिटी शो 'बिग बॉस 7' चा ग्रँड फिनाले जस-जसा जवळ येत आहे, त्याच्यासोबत जोडलेले नवीन वादसुध्दा समोर
येत आहेत. शोची स्पर्धक सोफिया हयातने 29 डिसेंबरला होणा-या ग्रँड फिनालेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. शोची परंपरा आहे, की शोच्या बाहेर झालेल्या स्पर्धकांना ग्रँड फिनालेच्या दिवशी एकत्र बोलवण्यात येत. सोफियाला उपस्शित राहण्यात काहीच रूची नाहीये. या शोमधील स्पर्धक अरमान कोहलीने तिच्यासोबत केलेला प्रकार आणि त्याप्रकरणात त्याची लगेच झालेली सुटका यांमुळे ती नाराज आहे. याकारणाने सोफियाने ग्रँड फिनालेमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोफिया त्याचवेळी चर्चेत आली होती जेव्हा तिने शोच्या बाहेर येऊन अरमान कोहलीवर शारीरिक छळाचा आरोप लावून त्याच्या विरूध्द तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर लगेच काही तासांमध्ये पोलिसांनी अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक केली होती.
पुढील स्लाइड शोमध्ये जाणून घ्या सोफियाने कशी व्यक्त केली नाराजी ...