आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSSमध्ये आज होणार एलिमिनेशन, सोफिया हयात पडणार घराबाहेर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीश अभिनेत्री आणि गायिका सोफिया हयात आज बिग बॉस या शोमधून बाहेर पडणार आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसिद्धी मिळवण्याची एकही संधी सोफियाने आपल्या हातून गमावली नाही. अरमान कोहलीबरोबर झालेली धक्काबुक्की असो किंवा दुस-या महिला स्पर्धकांबरोबरची कॅटफाईट असो, सोफियाने भरपूर लाईमलाईट मिळवले.
बिग बॉसच्या विश्वसनीय सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसचा आज एलिमिनेशन वार असून याआठवड्यात सोफिया घराबाहेर पडणार आहे.
आज (शनिवारी) एका सदस्याचे घराबाहेर पडणे पक्के आहे. प्रेक्षकांच्या मिळालेल्या कमी मतांच्या आधारावर सोफिया घराबाहेर पडू शकते. सोफिया गेल्या पाच आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरात आहे.