रिअलिटी शो 'बिग बॉस 7'चा ग्रँड फिनाले 29 डिसेंबरला होणार आहे. बिग बॉसच्या सातव्या पर्वात वादाशिवाय दुसरं काही दिसलचं नाही. फक्त वादांनी भरलेला शो वाटला. शोची पूर्वीची स्पर्धक सोफिया हयातने अरमान कोहली विरूध्द तक्रार दाखल केल्यानंतर बिग बॉस बराच चर्चेत होता. अरमानला जामीन मिळाल्यामुळे सोफिया हयात नाराज झाली आहे. तिने शोच्या फिनालेमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शोच्या ग्रँड फिनालेपूर्वीच सोफिया लंडनला रवाना होणार आहे. शोच्या परंपरेनुसार शोच्या बाहेर झालेल्या स्पर्धकांना फिनालेमध्ये बोलवण्यात येतं. परंतु सोफियाला फिनालेमध्ये उपस्थित राहण्यात काहीच रुची नाहीये. सोफियाचं म्हणणं आहे, की तिला अरमानमुळे शोच्या फिनालेमध्ये येण्याची इच्छा नाहीये. जर चॅनलने तिचे सर्व पैसे दिले नाहीत तर कायदेशीर कारवाई करेलं, असंही ती म्हणाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती