आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीच्या वेशभूषेत सोहा अली खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई -‘साहिब बीवी और गँगस्टर रिटर्न्स’ या सिक्वेलचा फर्स्ट लूक नुकताच पार पडला. या चित्रपटात इम्रान खान, जेमी शेरगील माही गिल आणि सोहा अली खान यांच्या भूमिका आहेत. या कार्यक्रमात सोहाने तिच्या आजीचे दागिने व त्यांची साडी परिधान केली होती. सोहाची आजी साजिदा सुलतान 4 ऑगस्ट 1915 ते 5 सप्टेंबर 1995 दरम्यान भोपाळच्या बेगम होत्या. तेथील शेवटचे नवाब हमीदुल्लाह खान यांच्या त्या द्वितीय कन्या. साजिदा यांनी 23 एप्रिल 1939 रोजी पतौडीचे नवाब इफ्तेखार अली खान यांच्यासोबत विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव मन्सूर अली खान म्हणजेच क्रिकेटर नवाब पतौडी. सोहा ही त्यांची मुलगी आहे.