आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi And Shahid On DID 4, To 'R Rajkumar' Promotion.

पायाला दुखापत होऊनसुद्धा डीआयडीच्या मंचावर थिरकली सोनाक्षी, शाहिदची मिळाली साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे कामाविषयीचे डेडिकेशन स्पष्ट दिसून येतं. 'बुलेट राजा' आणि 'आर.. राजकुमार' या दोन्ही सिनेमांचे प्रमोशन तिने योग्यरित्या सांभाळले.

सोनाक्षीचा 'बुलेट राजा' हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला, तर 'आर... राजकुमार' रिलीजच्या मार्गावर आहे. आपल्या याच आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाक्षी शाहिद कपूरसह 'डीआयडी'च्या मंचावर पोहोचली. खरं तर सोनाक्षीच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र तरीदेखील प्रमोशन रद्द न करता ती पायाला पट्टी बांधून सोनाक्षी डीआयडीच्या सेटवर अवतरली.

सोनाक्षी शाहिदच्या खांद्याचा आधार घेत लंगडत मंचावर पोहोचली. तिने आपल्या चाहत्यांची मुळीच निराशा केली नाही. पायाला दुखापत असूनसुद्धा ती मंचावर थोडीशी थिरकली. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक प्रभूदेवासुद्धा शाहिद आणि सोनाक्षीसह आले होते. येत्या सहा डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पु़ढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा शाहिद-सोनाक्षीची मस्ती....