आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगसाठी सोडले शिक्षण, फिल्ममध्ये दिले इंटीमेट सीन्स, आता करतेय TV शो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजत आहे. या मालिकेची कथा देवव्रत देव दीक्षित आणि डॉ. सोनाक्षी बोस यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे. देवची भूमिका अभिनेता साहिर शेख साकारत आहे. साहिरला लोक महाभारतातील अर्जुनच्या भूमिकेसाठी ओळखतात. मात्र सोनाक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिस पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर लीड रोल साकारताना दिसतेय. यापूर्वी फिल्म्समध्ये तिने इंटीमेट सीन्स दिले आहेत.

मिस इंडिया पेजेंटमध्ये झाली होती सहभागी...
अभिनयात करिअर करण्यापूर्वी एरिकाने मॉडेल म्हणून काम केले आहे. २०१२ मध्ये ती मिस इंडिया पेजेंटमध्ये सहभागी झाली होती. या सौंदर्य स्पर्धेत तिने टॉप १० मध्ये स्थान मिळवले होते. एरिकाने BA ला प्रवेश घेतला होता. मात्र मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने शिक्षणासाठी पाठ फिरवली होती.
दाक्षिणात्य सिनेमांमध्ये केलंय काम...
एरिकाने २०१३ मध्ये 'Ainthu Ainthu Ainthu' या सिनेमाद्वारे दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. कन्नड, तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये ती झळकली आहे. लीड अॅक्ट्रेस म्हणून एरिका बब्लू हॅपी है या बॉलिवूड सिनेमात झळकली होती. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात एरिकाने अभिनेता साहिल आनंदसोबत सेक्स सीन देऊन खळबळ उडवून दिली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, एरिकाचे खास Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...