आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: टेलिव्हिजनवर सोनाक्षीची धमाकेदार एन्ट्री, लाँच केले 'Indian Idol Junior'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लाँचिंगवेळी स्पर्धक आणि शोचे जज विशाल-शाल्मलीसोबत सोनाक्षी सिन्हा)
मुंबईः 2010 मध्ये 'दबंग' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवताना दिसणार आहे. 'इंडियन आयडॉल ज्युनिअर सीजन- 2' मध्ये सोनाक्षी परीक्षकाच्या खूर्चीत दिसणार आहे.
गुरुवारी सोनाक्षीने 'इंडियन आयडॉल ज्युनिअर सीजन- 2' हा सांगितिक रिअॅलिटी शो लाँच केला. गायिका शाल्मली खोलगडे आणि विशाल ददलानी हे सुद्धा शोचे परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर हुसैन कुवाजेरवाला आणि आशा नेगी शोचे होस्ट आहेत.
लाँचिंग इव्हेंटमध्ये सोनाक्षी चिमुकल्या स्पर्धकांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली. मीडियाशी बातचित करताना तिने सांगितले, की गायन आणि नृत्यात तिला बालपणीपासूनच आवड आहे. सिनेमांच्या माध्यमातून डान्सिंग स्किल्स प्रेक्षकांनी पाहिले आहेत. मात्र आता या शोच्या माध्यमातून तिला गाण्याची संधी मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'इंडियन आयडॉल ज्युनिअर सीजन- 2'च्या लाँचिंगवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...