आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonali Bendre Will Becomes The Highest Paid TV Actress Ever

एका एपिसोडसाठी 4 लाख रुपये घेणार सोनाली, ठरणार सर्वात महागडी TV अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री सोनाली बेंद्रे)

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री ठरणार आहे. 'अजबी दास्तां है ये' या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेणार असल्याची बातमी आहे. इंडस्ट्रीशी निगडीत सूत्रांनुसार, सोनालीने आपल्या या डेब्यू शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधनाची मागणी केली असून निर्माती एकता कपूरने ती मान्य केली आहे. सोनालीला मालिकेत कास्ट करणे फायद्याचे ठरेल, असे एकताचे मत आहे.
आत्तापर्यंत अंकिता लोखंडे टीव्ही इंडस्ट्रीतील महागडी अभिनेत्री समजले जात होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी अंकिताला 90 हजार ते 1.15 लाखांच्या घरात मानधन मिळत होते.
रिअॅलिटी शोजमध्ये पार पाडली परीक्षकाची भूमिका...
सोनाली बेंद्रे बॉलिवूडमध्ये 'दिलजले'(1996), 'सरफरोश' (1999), 'जिस देश में गंगा रहता है' (2000) आणि 'चोरी-चोरी' (2003) यांसह ब-याच सिनेमांमध्ये झळकली आहे. तसेच 2008 मध्ये टीव्हीवर प्रसारित होणा-या 'इंडियन आयडॉल 4' या शोमध्ये जजच्या भूमिकेत ती दिसली होती. सध्या ती 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' हा शो सोनाली जज करत आहे.
अलीकडेच रिलीज झाला मालिकेचा प्रोमो...
सोनालीच्या नवीन मालिकेचा प्रोमो अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. ही एक फिक्शन मालिका असून 'अजीब दास्तां है ये' हे सोनालीच्या नवीन मालिकेचे शीर्षक आहे. लाइफ ओके वाहिनीवर लवकरच ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत सोनालीसह अपूर्व अग्निहोत्री आणि हर्ष छाया महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये सोनाली आणि अपूर्व यांच्यातील तू तू मैं मैं पाहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहबाह्य संबंधांवर या मालिकेचे कथानक आधारित आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या काही निवडक अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा...