आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonali Raut And Puneet Issar Evicted From Bigg Boss

Bigg Boss 8: पुनीत-सोनाली झाले एविक्ट, सलमानने शोला म्हटले अलविदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खानने 'बिग बॉस 8'ला म्हटले अलविदा)
मुंबई- उपेन पटेलनंतर अखेर सोनाली राऊत आणि पुनीत इस्सर या आठवड्यात 'बिग बॉस'मधून एविक्ट झाले. फिनालेदरम्यान सलमानने शोच्या पाच चॅम्पियन्सचे नाव घोषित केले. सोनाली राऊत आणि पुनीत इस्सरनंतर करिश्मा, गौतम, प्रीतम, अली आणि डिम्पी हे पाच चॅम्पियन्स आहेत. त्यानंतर शोमध्ये एक महिना हल्लाबोल करण्यासाठी सना खान, संभावना सेठ, राहूल महाजन, एजाज खान आणि महक चहल यांची एंट्री झाली आहे. घरात उपस्थित 10 स्पर्धकांमधून एकच शोचा विजेता ठरणार आहे.
सलमानने 'बिग बॉस'ला म्हटले Bye Bye-
सलमान खानने शनिवारी अखेर घोषणा केली, की तो 'बिग बॉस 8'ला सोडणार आहे. त्याने सांगितले, की त्याचा करार संपला असून त्याला 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे शूटिंग करायचे होते. त्यामुळे तो शो सोडत आहे. मात्र, सलमानने असेही सांगितले, की घरातील सदस्यांना असे सोडून जाण्यास त्याला वाईट वाटत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शनिवारच्या एपिसोडची काही न पाहिलेली छायाचित्रे...