आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss-8: घरातून बाहेर होताच सोनालीने लावला निर्मात्यावर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनाली राऊत)
मुंबई: 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाला सुरुवात होऊन केवळ एक आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. 'एक्सपोज गर्ल' सोनाली राऊत या शोमधून बाहेर झाली आहे. शोमधून आऊट झाल्यानंतर सोनालीने '100 परसेंट यूजलेस' (फ्लोअरवर आहे सध्या) सिनेमाच्या निर्मात्यावर आरोप लावला आहे. ती म्हणाली, की निर्मात्यामुळे ती 'बिग बॉस'च्या घरात जास्त काळ टिकू शकली नाही. पहिल्या दिवसापासूनच सोनालीची वागणून वेगळी होती.
ती घरात नेहमी एकटी आणि इतर स्पर्धकांपासून दूर राहत होती. एवढेच काय, सलमानलासुध्दा ती घराबाहेर होण्याचा धक्का बसला आहे. शोमधून बाहेर झाल्यानंतर सोनाली म्हणाली, 'मी तिथे धमाल-मस्ती करायला गेले होते. मला माहित होते स्वत:ची ओळख करून देण्यास हा शो खूप मदत करेल. असो, मला सलमान खानशी इंटरॅक्ट होण्याची संधी मिळाली. एक मुलगी यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू शकते.'