आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor And Fawad Afzal Khan Promotion Movie Khoobsurat

सोनमचा फिल्म प्रमोशनचा फंडा, रिअ‍ॅलिटी शोमध्ये केली मस्ती आणि डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एंटरटेनमेन्ट के लिए कुछ भी करेगा'च्या सेटवर सोनम कपूर
मुंबई: अभिनेत्री सोनम कपूर तिच्या 'खूबसूरत' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाली आहे. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरवण्यासाठी तिला कोणतीच कसर सोडण्याची इच्छा नाहीये. सोनम सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'एंटरटेनमेन्ट के लिए कुछ भी करेगा'च्या सेटवर पोहोचली होती.
प्रमोशनवेळी तिच्यासह फवाद अफजलसह अलीसुध्दा उपस्थित होता. फवादने सिनेमात सोनमच्या हीरोचे काम केले आहे. प्रत्येक इव्हेंटप्रमोण या ठिकाणीसुध्दा सोनमचा लूक खूपच आकर्षक दिसून आला. ती गाऊन लूकमध्ये सेटवर पोहोचली होती. शोच्या सेटवर सोनमने डान्सदेखील केला. दोन्ही स्टार्सनी फराह खान आणि अनु मलिकसह फोटोसुध्दा काढले. शोचा होस्ट कृष्णा आणि मोनानेसुध्दा सोनमसह धमाल केली.
यावर्षीचा सोनमचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी तिचा 'बेवकूफिया' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. 'खूबसूरत' हा 1980मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा रिमेक आहे. मुळ सिनेमात रेखा यांनी काम केले होते. सोनमची बहीण रिया आणि वडील अनिल कपूर यांनी सिनेमा निर्मित केला आहे. 19 सप्टेंबरला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... 'एंटरटेनमेन्ट...'च्या सेटवरील सोनमची छायाचित्रे...