मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर अलीकडेच 'झलक दिखला जा 7' या डान्सिंग रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहोचली होती. येथे तिने
आपल्या आगामी 'खुबसूरत' या आगामी सिनेमाचे प्रमोशन केले. यावेळी तिच्यासह तिचा को-स्टार आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसुद्धा हजर होता. 'झलक...'च्या सेटवर सोनम आणि धक-धक गर्ल माधुरी यांच्यात खास बाँडिंग बघायला मिळाली. दोघींनी सेटवर एकत्र डान्स करुन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
सोनम कपूर आणि फवाद खान स्टारर 'खुबसूरत' हा सिनेमा येत्या 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. शशांक घोष या सिनेमाचे दिग्दर्शक असून रिया कपूर, अनिल कपूर आणि सिद्धार्थ रॉय कपूर याचे निर्माते आहेत. सोनम आणि फवाद यांच्यासह या सिनेमात प्रसेनजीत चॅटर्जी, किरण खेर, रत्ना पाठक आणि अदिती राव हैदरी यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'झलक...'च्या सेटवर क्लिक झालेली सोनम आणि फवादची काही खास छायाचिेत्रे...