आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'...महादेव'ची 'पार्वती' बनली बॉलिवूड अॅक्ट्रेस, बिकिनी फोटोवरुन झाली होती कॉन्ट्रोव्हर्सी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः देवों के देव महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सोनारिका भदौरिया बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले असून 'सासें' हे तिच्या सिनेमाचे नाव आहे. सिनेमात सोनारिकाच्या अपोझिट अभिनेता रजनीश दुग्गल झळकणारेय. दिग्दर्शक राजीव एक रुइयांच्या या सिनेमाचे पोस्टर बघता ही हॉरर फिल्म असल्याचे समजते. सोनारिकाने 2015 मध्ये 'Jadoogadu' या दाक्षिणात्य सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती. तिचे आणखी दोन सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहे.

सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर करुन एकवटली होती चर्चा...
याचवर्षी जून महिन्यात सोनारिका इंस्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर करुन चर्चेत आली होती. या फोटोवर युजर्सनी अनेक वादग्रस्त कमेंट्स टाकल्या होत्या. त्यावर सोनारिकाने युजर्सवरचा राग व्यक्त करताना म्हटले होते, ''आपण कोणत्या काळात जगतोय, याचा कदाचित सगळ्यांना विसर पडला आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक बॉडी शेमिंगवर लढा देत आहेत, आणि आमच्या देशात मुलींना बिकिनी घालणे हा गुन्हा झधाला आहे. काही वेळापूर्वी मी बिकिनीतला माझा फोटो पोस्ट केला आणि क्षणात मला तो डिलीट करावा लागला. लोक माझ्याविषयी वाट्टेल ते बोलत असल्याने मला असे करावे लागले. खरं तर मी याकडे दुर्लक्ष करु शकली असती, मात्र मला वाटतं, की एवढ्या निगेटिव्ह प्रतिक्रिया झेलण्यासाठी मी अद्याप मॅच्युअर झालेली नाही.''

वडील बिझनेसमन आणि आई आहे गृहिणी...
23 वर्षीय सोनारिका भदौरियाच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नाही. तिचे वडील कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहेत, तर आई गृहिणी आहे. 2 डिसेंबर 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या सोनारिकाचे शिक्षण यशोधाम हायस्कूलमध्ये अँड सीनिअर कॉलेजमधून झाले आहे. 2011 मध्ये "तुम देना साथ मेरा" या मालिकेतून तिने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. अभिनयासोबत मॉडेलिंगसाठी सोनारिकाला ओळखले जाते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सोनारिकाचा हॉट अंदाज खास छायाचित्रांमधून...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...