आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांनंतर आता अशी दिसते \'सोनपरी\'ची प्रिन्सी, \'कुमकुम भाग्य\'च्या अॅक्ट्रेसची आहे मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2000 साली छोट्या पडद्यावर प्रसारित झालेली 'सोनपरी' ही मालिका आठवतेय का तुम्हाला... या मालिकेतील सोनपरीपासून ते फ्रुटीपर्यंतचे सर्वच पात्र अतिशय गाजले होते. विशेषतः या मालिकेतील चिमुकली प्रिन्सीला तर आपण विसरु शकत नाही. त्यावेळी प्रिन्सीची भूमिका साकारली होती चार वर्षांच्या झनक शुक्लाने.  24 जानेवारी 1996 रोजी जन्मलेली झनक आता 21 वर्षांची ब्युटीफुल गर्ल आहे. झनक 'कुमकुम भाग्य' या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर हरी शुक्ला यांची मुलगी आहे. 'कुमकुम भाग्य' या मालिकेत सुप्रिया अभिनेत्री श्रुती झाच्या आईच्या भूमिकेत झळकत आहे. 
 
शाहरुख खानच्या सिनेमात झळकली आहे झनक...
- 2003 साली रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर ‘कल हो न हो’ या सिनेमात झनक झळकली आहे.
- या सिनेमात झनकने प्रीती झिंटाच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती.
- ‘कल हो न हो’ या सिनेमाव्यतिरिक्त झनकने 'डेडलाइन: सिर्फ 24 घंटे' या सिनेमातसुद्धा काम केले आहे.
- तर छोट्या पडद्यावर 'सोनपरी' शिवाय ती ‘करिश्मा का करिश्मा’, 'हातिम', 'गुमराह' आणि अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे.

पुढील 4 स्लाईड्सवर वाचा, झनक शुक्लाविषयी आणखी बरंच काही...  
 
बातम्या आणखी आहेत...