(सिनेमा अभिनेत्री आणि मॉडेल सोफी चौधरी)
मुंबई: सिनेमा अभिनेत्री सोफी चौधरी 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमधून बाहेर पडली आहे. सोफी झलकमधून बाहेर पडल्याने थोडी उदास दिसून आली. यावेळी सोफीने Divyamarathi.Comसोबत बातचीत करून शोमधील अनुभवाविषयी सांगितले.
प्रश्न- तू 'झलक दिखला जा'मधून एलिमिनेट झाल्याने नाराज आहेस का?
उत्तर- माझी उदासी एक प्रकारची शांतता आहे. मी मनातून दु:खी झाली आहे.
प्रश्न- तुझा 'झलक...'मधील प्रवास कसा होता?
उत्तर- अविस्मरणीय अनुभव होता. फिजीकली आणि मेन्टली खूप थकव्याचे काम होते. पण एकूणच अनुभव खूप चांगला होता. शो खूप डिमांडिंग असतात. मी कधीच अर्धवट विचार करून कोणती गोष्ट केली नाही. मागील 15 आठवड्यात स्वत:ला 'झलक...'साठी समर्पित केले.
प्रश्न- तू तुझ्या पूर्ण प्रवासात आत्मविश्वास बाळगला?
उत्तर- मला खूप अभिमान होतोय, की मी एकमेक अशी स्पर्धक होते, जी डान्सर नव्हती. मी प्रत्येक आठवड्यात नवीन डान्स फॉर्म करण्याचा प्रयत्न केला. जिव, बचाता, कन्टेम्पररी, एरिअल, हिप हॉप, एक्राबेटिया, पासो डबल, मी शोमध्ये 'क्वीन्स ऑफ अवतार'च्या रुपात आळखले जात होते.
प्रश्न- शोमधील तुझा अविस्मरणीय क्षण आणि अनुभव कोणता होता?
उत्तर- माझा एरिअल परफॉर्मन्स माझा अविस्मरणीय क्षण होता. या परफॉर्मन्ससाठी मला 30 मार्क्स मिळाले होते आणि तो क्षण आठवणीत राहण्यासारखा आहे. शिवाय सलमान खान समोरचा माझा मिस्टर इंडिया परफॉर्मन्ससुध्दा अविस्मरणीय होता. करीना शोमध्ये आली तेव्हा म्हणाली होती, की तिला माझ्यावर अभिमान आहे मी तिची मैत्रीण आहे.
प्रश्न- तुझा आवडता परिक्षक कोणता आहे?
उत्तर- माधुरी नेहमीच माझी फेव्हरेट राहिलेली आहे. मागील 13 आठवड्यांपासून तिने माझे सौंदर्याची प्रशंसा केली आहे. करण जोहरसुध्दा माझा आवडता परिक्षक राहिला आहे. तो नेहमी बरोबर असतो आणि त्याला ठाऊक असते, काय करायचे आहे.
प्रश्न- या पर्वाचा विजेता कोण होऊ शकतो असे तूला वाटते?
उत्तर- मला वाटते पुनीत आणि मोनी विजेते ठरू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोफी चौधरीची खास छायाचित्रे...