आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Splitsvilla'चा गौरव बनला गौरी, राहतो मुलींप्रमाणे, पोस्ट करतो Bold फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'स्प्लिट्सविला'च्या आठव्या पर्वात झळकलेला एक स्पर्धक सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय ठरला आहे. गौरव अरोरा या स्पर्धकाने या शोदरम्यानच आपण समलैंगिक आहोत हे जाहिरपणे सांगितले होते. एका नावाजलेल्या वाहिनीवर स्वत:बद्दल जाहिरपणे सांगणारा गौरव गेला काही काळ अनेकांच्या नजरेआड झाला होता. पण, अचानक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला गौरव चर्चेचा विषय ठरत आहे.
गौरवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले फोटो पाहून सध्या अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावत आहेत. त्याच्यात झालेला हा बदल पाहता हा गौरवच आहे ना? असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. कमनीय बांधा, घायाळ करणाऱ्या अदा आणि चेहऱ्यावर वेगळेच भाव असणारे काही फोटो गौरवने शेअर केले आहेत. गौरवने स्वत:मध्ये एक महत्त्वाचा बदल करत यापुढील आयुष्य गौरी अरोरा म्हणून जगण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही इतर भारतीय मुलीप्रमाणे आपल्यालाही समान वर्तणूक मिळावी या कारणासाठी गौरवने हे पाऊल उचलले आहे.
गौरव अर्थात गौरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन लिहिले, "Call me GAURI" . गौरीने आता स्वतःला फॅशन आणि फिटनेस फ्रिक असल्याचे सांगतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, गौरव अर्थातच गौरी अरोराचे LATEST INSTAGRAM PHOTOS....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...