आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांकाच्या लग्नापूर्वी ब्रेकअपवर बोलला Ex-Boyfriend, चुकीवर व्यक्त केला खेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा - Divya Marathi
दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा
मुंबई: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या लग्नाला चार दिवस शिल्लक आहेत. दिव्यांका-विवेकच्या लग्नापूर्वी दिव्यांकाचा Ex-Boyfriend शरद मल्होत्राला तिच्यासोबतचे काही क्षण आठवले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिव्यांका आणि शरद रिलेशनशिपमध्ये होते.
जाणून घ्या दिव्यांकाविषयी काय म्हणाला शरद...
एका मुलाखतीत शरदने दिव्यांकासोबत घालवलेले क्षण आठवून शरद म्हणाला, की रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होणे सामान्य आहे. हे प्रत्येकाच्या आयुष्यात होते. दुर्दैवाने काही रिलेशनशिप शेवटपर्यंत टिकत नाहीत, परंतु आपण त्या व्यक्तीचा नेहमी आदर करावा.
प्रेमात नसला तरी आदर करा...
शरद म्हणाला, 'जेव्हा तुम्हा प्रेमात पडता तेव्हा ते वेगळे जग असते. परंतु तुम्ही वेगळे झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला वाईट बोलणे योग्य नाही. जर तुम्ही प्रेमात पडला आहात तर ते व्यक्त करा, परंतु तुम्ही प्रेमात नसता तेव्हा त्या व्यक्तीचा आदर करायला हवा. माझ्याविषयी सांगायचे झाले तर लोकांना दुखवू नये माझा प्रयत्न असतो. परंतु मला ठाऊक आहे, लोक काही कारणास्तव माझ्यामुळे दु:खी होतात.'
ब्रेकअपनंतर लोक माझ्याविषयी वाईट बोलायला लागले...
ब्रेकअपचा खुलासा करताना शरदने सांगितले, की जेव्हा त्याचे दिव्यांकासोबत ब्रेकअप झाले तेव्हा लोक माझ्याविषयी वाईट बोलू लागले होते. मला माहित आहे, की हे माझे आयुष्य आहे. कुणी दुसरे मला जज करू शकत नाही. कारण ते या परिस्थितीतून गेले नाहीत.
शरदने दिव्यांकाला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा...
शरदने अलीकडेच दिव्यांका लग्नाचा शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, 'मी दिव्यांकाला ऑल द बेस्ट म्हणतो. ती खूपच फँटेस्टिक मुलगी आहे आणि मी तिला माझ्या वेल विशेज देतो. तिच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद नेहमी राहो.'
7 वर्षे चालले दोघांचे अफेअर...
दिव्यांका आणि शरद यांचे याचवर्षी मार्च महिन्यात ब्रेकअप झाले. गेल्या सात वर्षांपासून हे दोघे डेट करत होते. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. बरीच वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र मार्च महिन्यात दिव्यांकाने ब्रेकअप झाल्याचे उघड केले.
दिव्यांकानंतर या अॅक्ट्रेसला करतोय डेट...
दिव्यांका त्रिपाठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टीव्हीचा महाराणा प्रताप अर्थातच शरद मल्होत्रा सध्या पूजा बिष्टला डेट करत आहे. असे आम्ही नव्हे, काही एंटरटेन्मेंट पोर्टल्सवर चर्चा सुरु आहे. पूजाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर झालेल्या शरद मल्होत्रासोबतचे फोटो आणि काही कॅप्शन्सनंतर बातम्यांना उधाण आले आहे. एका फोटोसोबत पूजाने लिहिले, 'खरंच एंजेल्स असतात का? तुला भेटण्यापूर्वी मला माहित नव्हते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका-विवेकचे प्री-वेडिंग फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...