आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महाभारत’च्या सेटवर 120 कोटींचा खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमारे तीस वर्षांपूर्वी बी. आर. चोप्रा यांनी दूरदर्शनवर ‘महाभारत’ ही मालिका सुरू केली होती. त्या वेळी ही मालिका देशात प्रचंड लोकप्रिय ठरली होती. याची क्रेझ आजही पाहायला मिळत आहे. सध्या स्टार प्लसवर सुरू असलेल्या ‘महाभारत’ या मालिकेच्या सेटवर तब्बल 120 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही मालिका सुरू झाली आहे. सिद्धार्थ तिवारी यांनी ‘महाभारत’चे दिग्दर्शन केले आहे. या मालिकेत कृष्णाची भूमिका सौरभ राज जैन याने साकारली आहे, तर अर्जुनच्या भूमिकेत शाहीर शेख, युधिष्ठिरच्या भूमिकेत रोहित भारद्वाज, भीमाच्या भूमिकेत सौरव गुर्जर, दुर्योधनच्या भूमिकेत अर्पित रंका, शकुनीमामाच्या भूमिकेत पुनीत भट्ट, पितामहच्या भूमिकेत अरव चौधरी, धृतराष्ट्रच्या भूमिकेत अनुप सिंह, कुंतीच्या भूमिकेत शफख नाज आणि कर्णाच्या भूमिकेत अहम शर्मा हे कलाकार सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत.

दमदार अभिनयासोबतच प्रेक्षकांच्या आकषर्णाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो या मालिकेचा भव्य-दिव्य सेट. ‘महाभारत’चा सेट, स्टारकास्टवर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. महाभारताचा राजेशाही थाट दाखवण्यासाठी अशा सेटची निर्मिती करण्यात आली आहे. गुजरातमधील उमरगाव येथील दहा एकरमध्ये हा सेट उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक ओमुंग कुमार यांनी हा सेट डिझाइन केला आहे.

परदेशातही चित्रीकरण
महाभारत या मालिकेचे चित्रीकरण भारतासह परदेशातील अनेक नयनरम्य ठिकाणी करण्यात आले आहे. काश्मीर, जयपूर जैसलमेर, अहमदाबाद, बेळाघाट, र्शीलंका आणि नेपाळमधील काही शहरांत मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक भागाला एक वेगळा लूक मिळाल्याचे दिग्दर्शक तिवारी यांनी सांगितले.

ग्राफिक्सवर दोनशे जणांच्या टीमचे लक्ष
‘महाभारत’च्या क्रिएटिव्ह आणि प्रॉडक्शन टीममध्ये जवळपास 400 लोक काम करत आहेत. यापैकी 200 जण हे केवळ ग्राफिक्सवर काम करत आहेत. असा सेट अधिक भव्य दिव्य दिसण्यासाठी ग्राफिक्सचा मोठा वापर करण्यात येतो. त्यामुळेच तिवारी यांनी ‘महाभारत’मध्ये व्हिज्युअल इफेक्ट आणि थ्रीडीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला आहे.