आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Thats me Baboosha.. जनतेतून आलेली Bigg Boss ची स्पर्धक, पाहा Glamours Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेकअप, ग्लॅमर, स्टाइल दॅट्स मी बबुशा.. अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या या महिलेचे नाव आहे रुचिका सिंग. रुचिका ही बिगबॉसच्या दहाव्या सीझनमधील लोकांमधून निवडलेली स्पर्धक आहे. एकूण सामान्य नागरिकांमधून निवडल्या जाणाऱ्या 13 स्पर्धकांपैकी ती एक आहे.

रुचिका ही स्वयंघोषित सेल्फी क्वीन आहे. तिने फेसबूक पेजवरही तिचे नाव सेल्फी क्वीन बबुशा असे लिहिलेले आहे. 39 वर्षांची रुचिका ही दिल्लीची आहे. ड्रामा आपल्या अंगात ठासून भरला असल्याचा दावा रुचिका करते. त्याचवेळी खूप धार्मिक असल्याचेही रुचिका सांगते.

तरुणांनी ड्रग्सपासून दूर राहावे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा बिग बॉसमध्ये येण्याचा उद्देश असल्याचे रुचिका उर्फ बबुशा म्हणाली. पार्टी करायला खूप आवडत असल्याचे रुचिका सांगते. तिचे यूट्यबब चॅनलही आहे. तिला सेल्फी व्हिडीओ शूट करून ते सोशल मिडियावर अपलोड करायला आवडते.

रुचिकाचे शालेय शिक्षण दिल्लीतच पूर्ण झाले. तिच्या हॉबीची लिस्ट मोठी आहे. पण तिला विशेषतः डान्स करायला, गाणी ऐकायला आवडते. धार्मिक विषयांवर वाचन करायलाही तिला आवडते.
बातम्या आणखी आहेत...