मुंबई - बॉलिवूड आणि अनेक टीव्ह शोमध्ये काम केलेली अभिनेत्री दीप्ती भटनागर 50 वर्षांची झाली आहे. 30 सप्टेंबर 1967ला मेरठमध्ये जन्मलेल्या दीप्तीला सर्वाधिक लोकप्रियता स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या 'यात्रा' या शोमधून मिळाली. तिने स्टार प्लसवरील 'मुसाफिर हू यारो' हा ट्रॅव्हल शोजदेखील होस्ट केलाय. या शोसाठी तिने 6 वर्षांत जवळपास 80 देशांची रिपोर्टिंग केली.
सिंपल मेकअप आणि साडी लूकमध्ये दीप्तीने प्रेक्षकांना देशातील प्रमुख मंदिरांची सैर करून दिली. तिचा असाच लूक आजही लोकांच्या मनात आहे. छोट्या पडद्यावर देसी अवतारात दिसली असली तरी रिअल लाइफमध्ये ती खूपच ग्लॅमरस आहे. 'कालिया' (1997), 'मन'(1999), 'चोरी चोरी चुपके चुपके(2001), 'रोक सको तो रोक लो'(2004)सारख्या अनेक सिनेमांत तिने काम केले आहे. सोबतच दीप्तीने बोल्ड फोटोशूटसुध्दा केले आहे.
प्रेम आणि लग्न
दीप्ती 'मुसाफिर हू यारो'च्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक रणदीप आर्यच्या प्रेमात पडली. दिर्घकाळाच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केले. दोघांना आता शिव आणि शुभ असे दोन मुले आहेत. दीप्ती आता इंडस्ट्रीपासून दूर झाली असली तरी, तिने स्वत:ची ऑनलाइन यात्रा चॅनल 'travelwithdeeptibhatnagar.com' सुरु ठेवलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा धार्मिक शो होस्ट करणा-या दीप्ती भटनागरचे ग्लॅमरस PHOTOS..