आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसनेही गाजवले Bigg Boss, ठरली होती घरातील सदस्यांच्या डोक्याचा ताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस 10' या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वात सध्या अर्शी खान हिचे सर्वांशी भांडण होताना दिसत आहे. पण बिग बॉसच्या घरातील भांडणांचा विषय निघाला की, आवर्जुन डोळ्यासमोर येणारे नाव म्हणजे डॉली बिंद्राचे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात अभिनेत्री डॉली बिंद्राचे श्वेता तिवारीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घराबाहेरील तिची भांडणं चांगलीच गाजली आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या शेजा-यांनी तिच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 
 
या सिनेमांमध्ये झळकली आहे डॉली बिंद्रा...
20 जानेवारी 1970 रोजी मुंबईत जन्मलेल्या डॉली बिंद्राने वयाच्या 18 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. खिलाडियों का खिलाडी (1996), गदर: एक प्रेम कथा (2001), यादें (2001), जो बोले सो निहाल (2005), डॉली की डोली (2015) या सिनेमांमध्ये डॉली झळकली आहे.

बिग बॉसच्या घरात होता डॉलीचा दबदबा...
डॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागीझाली होती. भांडणं, वादविवाद करण्यात पटाईत असलेली डॉली बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी डोक्याला ताप ठरली होती. बाप पर मता जाना हे तिचे आवडते वाक्य होते. नेमक्या कुठल्या गोष्टीवरुन तिचा पारा चढेल, ही गोष्ट घरातील सदस्यांच्या समजण्यापलीकडे होती. श्वेता तिवारीसोबतचे तिचे भांडण चांगलेच गाजले होते.

डॉलीला त्रासले होते शेजारी...
2014 मध्या मालाड स्थित भूमी हाउसिंग सोसायटीने डॉली बिंद्राविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्यावर शेजा-यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. एका रिपोर्टनुसार, डॉलीच्या गैरवर्तणुकीमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हते.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, डॉली बिंद्राचे Unseen Photos... 
बातम्या आणखी आहेत...