आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या अफेयरने गाजले होते Bigg Boss 8, आल्या होत्या प्रेग्नंसीच्या बातम्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'बिग बॉस'च्या च्या 11 व्या सिझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्याच दोन तीन दिवसांत या घरात असे काही क्षण येऊन गेले की, आगामी तीन महिन्यात काय काय होणार याची कल्पना आली. भांडण, वाद, गॉसिपिंग आणि प्रेमाची चाहूल असे अनेक रंग या घरात पाहायला मिळत असतात. 

बिग बॉसमध्ये आतापर्यंत अनेक कपल्सचे अफेयर जमल्याचे पाहायला मिळाले आहे. यापैकी काही अफेयर्स घरापुरतीच मर्यादीत राहिली तर काही अफेयर्स बाहेर आल्यानंतरही सुरू राहिले. बिग बॉसच्या घरातील असेच गाजलेले एक अफेयर म्हणजे गौतम गुलाची आणि मॉडेल डियांड्रा सोरेस. बिग बॉसच्या आठव्या पर्वात डियांड्रा आणि गौतम स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या दोघांच्या अफेयरच्या एवढ्या चर्चा झाल्या की, डियांड्रा शोमधून बाहेर पडली तेव्हा ती प्रेग्नंट असल्यामुळे बाहेर पडली असे म्हटले गेले. डियांड्राने मात्र तसे काही नसल्याचे अनेकदा स्पष्ट केले. 

अनेकदा झाले होते इंटिमेट 
डियांड्रा आणि गौतम यांच्या अफेरयच्या दरम्यान दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. अनेकदा ते एकमेकांना किस करताना आणि इंटिमेट होतानाही दिसले होते. विशेष म्हणजे गौतमच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉसच्या घरात घडलेल्या एका घटनेने डियांड्राच्या प्रेग्नंसीच्या चर्चा समोर आल्या होत्या. यादिवशी डियांड्रा आणि गौतम मस्ती करताना बाथरूममध्ये गेले होते. दार लावून त्यांनी आत बराच वेळ घालवला होता. त्यादिवशी तीन ते चार वेळा दोघे इंटिमेट झाले होते. डियांड्राने घरातून बाहेर पडल्यानंतर तिचे खरंच गौतमवर प्रेम होते असे म्हटले होते. 

गौतम म्हणाला तसे काही नाही..
गौतमने मात्र डियांड्राबरोबर तसे काही नसल्याचे म्हटले होते. आम्ही फक्त मित्र होतो, त्याच्या पलिकडे काहीही नव्हते, असे गौतम म्हणाला होता. उलट शो जिंकल्यानंतर एका मुलाखतीत गौतम म्हणाला होता की, मला तिच्याबरोबर बाथरूममध्ये गेल्याचा पश्चात्ताप होत आहे. मी माझी आई सांगेल त्या मुलीशी लग्न करणार आहे, असे गौतमने स्पष्ट केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर, डियांड्रा आणि गौतम यांच्या अफेयरबाबत बरेच काही सांगणारे बिग बॉस 8 मधील PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...