आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजवर केस करणारी आकांक्षा रियल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस, 'बिग बॉस'ची होती कंटेस्टंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'बिग बॉस-10'ची कंटेस्टंट आणि क्रिकेटपटू युवराज सिंगची वहिणी आकांक्षा शर्माने युवीसह त्याच्या आई आणि भावावर कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आकांक्षाचे युवराजचा भाऊ जोरावर बरोबर लग्न झाले होते. पण ते लग्न फक्त 13 महिने टिकले होते. आकांक्षा बिग बॉसच्या मागच्या पर्वात झळकली होती. तेव्हा तिने युवीच्या आईवर अनेक आरोपही केले होते. 
 
आकांक्षा रियल लाईफमध्ये इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोसह सेक्ससारख्या मुद्द्यावर पोस्ट करत असते. सध्या ती पतीपासून वेगळी गुडगावमध्ये आई वडिलांबरोबर राहते. आकांक्षा पार्टीजची शौकिन आहे. स्मोकिंग करतानाचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत. तिने मानेखाली कर्मा असे गोंदलेला टॅटूही केला आहे.

13 महीनेच टिकले लग्न
- 27 फेब्रुवारी, 2014 ला आकांक्षाचे लग्न युवराजचा भाऊ जोरावर बरोबर झाले होते. 30 एप्रिल 2015 ला या कपलने घटस्फोटासाठी अर्ज दिला. 
- रिपोर्टनुसार, हनिमूनसाठी ते गोवा, दुबई आणि नंतर मलेशियाला गेले होते. 
- परत आल्यानंतर आकांक्षाने पतीबरोबर संबंध ठेवायला स्पष्ट नकार दिला होता. 
- त्यानंतर दोघांमधील संबंध अधिक ताणले गेले. आकांक्षाने गुडगावला शिफ्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. 
- आकांक्षाच्या करिअरमध्ये मदत व्हावी म्हणून जोरावर गुडगावला जायला तयार झाला. एका महिन्याने ते शिफ्ट झाले. ती सर्वात मोठी चूक होती, असे जोरावर म्हणतो.

आकांक्षाच्या ड्रग्जच्या सवयीला त्रासला होता जोरावर
- गुडगावला शिफ्ट झाल्यानंतर आकांक्षा जुन्या मित्रांना रोज भेटू लागली. 
- जोरावर तिच्या लेट नाईट पार्ट्यांना त्रासला होता. मित्रांबरोबर ती ड्रग्जही घ्यायची. 
- आकांथा जोरावरला दारु आणि सिगारेटसाठीचे व्यसन करण्यासाठी बळजबरी करायची अशा उल्लेख घटस्फोटांच्या कागदपत्रांतही आहे.

आकांक्षा म्हणते सासूमुळे नवऱ्याला सोडले
बिग बॉसमध्ये एंट्री करताना सलमानला स्वतःची कथा सांगताना आकांक्षा इमोशनल झाली होती. लग्नानंतर एवढी वाइट अवस्था झाली होती, की जगण्यापेक्षा मेलेलं बरं असे आकांक्षा म्हणाली होती. वयाच्या 23 व्या वर्षीच लग्न झाले पण युवराजच्या भावात कधी लाइफ पार्टनरही दिसला नाही, किंवा मित्रही दिसला नाही, असे आकांक्षाने सांगितले होते.पतीपासून विभक्त होण्यास सासू म्हणजे युवराजची आई शबनम जबाबदार असल्याचे आकांक्षा म्हणाली होती. सासूच्या वाईट वर्तणुकीमुळे ती एवढी परेशान होती, की तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला असे तिने सांगितले. सासरच्या मंडळींकडून घटस्फोटाशिवाय दुसरे काहीही हवे नसल्याचे ती म्हणाली.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आकांक्षाने शेयर केलेले तिचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...