आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बा'च्या अंत्यसंस्कारात पोहोचले टीव्ही स्टार्स, स्मृती ईराणींनी व्यक्त केला शोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सुधा शिवपूरी यांची अंत्ययात्रा, खाली 'क्योकी सास भी कभी बहू थी'चे स्टारकास्ट आणि अश्विनी काल्सेकर)
मुंबई- एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील 'बा'च्या भूमिकेने घरा-घरात पोहोचलेल्या सुधा शिवपूरी यांचे बुधवारी (20 मे) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 78 वर्षांच्या सुधा यांच्या पाश्चात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
टीव्ही जगातील अनेक कलाकरांनी त्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थिती लावली होती. त्यामध्ये मोनी रॉय, हितेश तेजवानी, गैरी तेजवानी, रकक्षंदा खान, गौतमी कपूर, अश्विनी कालेस्कर, मानिनी मिश्रा, श्लिपा सकलानी आणि जया भटाचार्य सामील होते.
टीव्ही शो 'क्योकी सास भी कभी बहू थी'मध्ये सुधा शिवपूरी यांच्यासोबत काम केलेल्या स्मृती इराणी अंत्यसंस्कारला येऊ शकल्या नाही, मात्र त्यांनी शोक व्यक्त करून सांगितले, 'सुधाजी यांच्या जाण्याने मी अत्यंत दु:खी आहे. त्या माझ्यासाठी आई समान होत्या. सुधाजी आणि माझे 10-12 वर्षांची साथ असली तरी त्या माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होत्या. त्या आज आपल्या नसल्या तरी त्यांनी मला जे शिकवले ते माझ्यासोबत आयुष्यभर राहिल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, हिच प्राथर्ना करते आणि माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.'
स्मृती ईराणी असेही म्हणाल्या, 'तुलसीचे आयुष्य असो अथवा स्मृती ईराणीचे, माझ्या लग्नापासून मुला-बाळांच्या जन्मापर्यंत आणि मी राजकारणातील प्रवास करत असताना त्यांनी मला नेहमी साथ दिली. त्यांचे आणि माझे फोनवर नेहमी बोलणे होत असे. हे नाते केवळ मालिकेपर्यंतच नव्हे तर त्यापेक्षा जास्त होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुधा शिवपूरी यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...