आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कपिल शर्मा शोमधील को स्टारबरोबर लग्न करणार कॉमेडियन सुगंधा मिश्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा. - Divya Marathi
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा.
मुंबई - 'द कपिल शर्मा' शोमध्ये विद्यावतीची भूमिका करणारी कॉमेडियन सुगंधा मिश्रा लवकरच याच शोमध्ये गेल्या काही एपिसोडमध्ये झळकणार्या डॉ. संकेत भोसलेबरोबर लग्न करणार आहे. संकेत या शोमध्ये संजय दत्तची मिमिक्री करताना दिसतो. दोघे वर्षभरापासून डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

सुंगधानेच आणले कपिलच्या शोमध्ये 
टिव्ही इंडस्ट्रीमध्ये असलेल्या काही मोजक्या प्रसिद्ध कॉमेडीयन्समध्ये सुगंधा मिश्राचे नाव घेतले जाते. 'द ग्रेट लाफ्टर चॅलेंज' शो (2005) द्वारे तिने डेब्यू केला होता. कपिलचा शो सोडलेल्या सुगंधानेच बॉयफ्रेंड संकेतला या शोमध्ये संधी मिळवून दिली होती. संकेत या शोमध्ये गेल्या काही एपिसोडपासून दिसत आहे. पण अगदी कमी काळात त्याने लोकांची पसंती मिळवल्याचे दिसते. डॉक्टर असलेला संकेत या शोमध्ये संजू बाबा (संजय दत्त) ची मिमिक्री करतो. त्याचे कॉमिक टायमिंगही चांगले आहे. शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींनाही त्याची अॅक्टींग आवडते. 

एका वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार सुगंधा आणि संकेत रिलेशनशीपमध्ये असून ते याबाबत गंभीर असल्याचेही समजत आहे. एवढेच नाही, तर दोघे लवकरच झी टिव्हीचा 'समर एक्सप्रेस 2017' हा शो एकत्र होस्ट करणार असल्याची माहितीही मिळाली आहे. तसेच दोघे सुनील ग्रोवरच्या शोमध्येही असण्याची शक्यता आहे. संकेतने कॉमेडी जगतात मोठे व्हावे अशी सुगंधाची इच्छा आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सुगंधा आणि संकेतचे 5 फोटोज..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...