आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांच्या 'युद्ध'मध्ये सुजित सरकार करणार अभिनय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शूबाइट' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ आणि सुजित सरकार यांची घट्ट मैत्री झाली होती. 2012 मध्ये सुजितच्या दिग्दर्शनात हा चित्रपट बनला होता. तेव्हापासूनच हा चित्रपट काही कारणांमुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, यामुळे अमिताभ-सुजित यांच्या मैत्रीत काहीच फरक पडला नाही. त्यांनी एकत्र काम करणे सुरूच ठेवले. गुजरात पर्यटनाच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानही सुजित अमिताभ यांच्यासोबत होता आणि तेथेच त्यांनी आपल्या 'पीकू' या नवीन चित्रपटाबाबत चर्चादेखील केली.
अमिताभ बच्चन यांची पहिली टीव्ही मालिका 'युद्ध' मध्येही तो क्रिएटिव्ह कंसल्टंट आहे. विशेष म्हणजे 'युद्ध' मध्ये सुजित अभिनयदेखील करणार आहे. त्याची या मालिकेत काय भूमिका असेल, याबाबत अद्याप काही माहीती मिळू शकली नाही. मात्र, तो मालिकेत अभिनय करणार असल्याचे निश्चित झाले आहे.