आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossमधून सुकिर्ती झाली आऊट, छायाचित्रांमध्ये पाहा आतापर्यंतचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुकिर्ती कांडपाल)
मुंबई: 'बिग बॉस'मध्ये शनिवारी घरातील सदस्याला बाहेर काढण्याची वेळ होती. परंतु हे एविक्शन रविवारी झाले. मागील आठवड्यात सोनाली राऊतचे घरातून एविक्शन झाले होते. परंतु तिला पुन्हा घरात एंट्री मिळाली. या आठवड्यात सुकिर्ती घरातून आऊट झाली आहे.
सुकिर्तीला सोनाली राऊतने आपल्या विशेष अधिकारांनी नॉमिनेट केले होते. सुरुवातीला वाटले होते, की सर्वात जास्त लोकांनी नॉमिनेट केल्याने गौतम या आठवड्यात घरातून बाहेर होण्याची शकता आहेत. परंतु गौतम आतापर्यंत सर्वात मनोरंजक सदस्य सिध्द झाला आहे. एकिकडे, गौतमला खलनायक बनवण्याचा करिश्माचा गेम उलटा पडला. लोकांची सहानुभूती गौतमला मिळाली.
सुकिर्तीच्या नाव जेव्हा एविक्शनसाठी घेण्यात आले, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळले. घरात सुकिर्ती, सोना सिंह आणि आर्य बब्बर यांची जवळीक होती. सुरुवातीला सुकिर्ती आणि उपेन पटेलला पाहून वाटले होते, की दोघांमध्ये रोमान्स पाहायला मिळू शकतो. परंतु असे काही झालेच नाही. आतापर्यंत प्रीतमच्या टीममध्ये राहिलेली सुकिर्ती मागील एपिसोडमध्ये गौतमशी भांडल्यामुळे अचानक चर्चेत आली होती. या आठवड्यात सुकिर्ती घरातून आऊट झाली आहे तर पाहणे रंजक ठरेल, की सोना सिंह पुढी कुणाशी जवळीक वाढवेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा छायाचित्रांमधून सुकिर्ती सिंहचा 'Bigg Boss'मधील आतापर्यंतचा प्रवास...