आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: आमिर-अजयसह काम करूनही नाही मिळाली प्रसिध्दी, 'गुत्थी'ने बनवले लोकप्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रिय विनोदवीर सुनील ग्रोवरने 'गुत्थी' म्हणून सर्वाधिक प्रसिध्द मिळवली आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. येथेच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह चंदीगढमध्ये शिफ्ट झाला आणि येथूनच आपल्या करिअरला सुरुवात केली.
जसपाल भट्टी यांना आपला आदर्श मानणा-या सुनीलने थिएटरवर छोट्या-मोठ्या भूमिका, काही सिनेमे आणि काही टीव्ही शो होस्ट केले आहेत. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या जिल्हा गाजियाबाद या सिनेमात तो फकीराच्या भूमिकेत झळकला होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सुनीलने दिवंगत जसपाल भट्टी यांच्यासह चंदीगढ थिएटरमध्ये काम केले.

2000मध्ये बॉलिवूडमध्ये केले पदार्पण
सुनीलने बॉलिवूड सुपरस्टार्स आमिर खान आणि अजय देवगण यांच्यासहसुध्दा काम केले.
2000मध्ये आलेल्या प्यार तो होना ही था या सिनेमात त्याने अजय देवगणसह काम केले. हा त्याला पहिलाच बॉलिवूड सिनेमा होता. मात्र या सिनेमात त्याला दोनच सीन मोठ्या मुश्किलने मिळाले. त्यानंतर सुनील पुन्हा एकदा अजयसह द लीजेंड ऑफ भगतसिंह (2002)मध्ये दिसला. यातही त्याला खूप कमी भूमिका मिळाली.
आमिर खानसहसुध्दा केली स्क्रिन शेअर
2008मध्ये आलेल्या 'गजिनी' ब्लॉकब्लस्टरमध्ये सुनीलने आमिर खानसह काम केले होते. या सिनेमात सुनील संपतच्या पात्रात त्याने आसिनच्या मित्राची भूमिका साकारली होती. आमिरची नकल करताना पहिल्यांदा लोकांनी सुनीलला या सिनेमात नोटिस केले होते. मात्र हा सिनेमासुध्दा त्याल हवी तेवढी प्रसिध्दी देऊ शकला नाही.
प्रसिध्द टीवी शो :
'क्या आप पांचवी फेल चंपू हैं' (फिल्मी वाहिनी) आणि 'गुटर गूं' (सब टीव्ही) या मालिकांनी त्याला चांगलीच प्रसिध्दी दिली. यातील त्याची कॉमेडी लोकांनी पसंत केली. सुनीलने आतापर्यंत डझनभर मालिका केल्या आहेत.

'कॉमेडी नाइट्स विद कपिल' (कलर्स)मध्ये मिळाले 'गुत्थी'चे पात्र
कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' हा शो अजूनही ऑन एअर आहे. या शोमध्ये सुनील ग्रोवरने 'गुत्थी' या स्त्रीचे पात्र साकारले होते. या पात्रातून त्याला लोकप्रिय मिळाली. सुनील ग्रोवर ऐवजी लोक त्याला 'गुत्थी' नावाने ओळखू लागले. मात्र काही मताभेदांनी त्याने हा शो सोडला आणि स्वत:चा 'मॅड इन इंडिया' (स्टार प्लस) हा कॉमेडी शो सुरु केला. पण यात त्याला यश आले नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुनील ग्रोवरचे काही खास छायाचित्रे...