आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : संघर्षाला मिळाली नशीबाची साथ, \'गुत्थी\'ने मिळवून दिला पैसा आणि प्रसिद्धी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुनील ग्रोवरची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची छायाचित्रे - Divya Marathi
अभिनेता सुनील ग्रोवरची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची छायाचित्रे

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय शोमध्ये गुत्थी हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर याचा आज 38 वा वाढदिवस आहे. 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. येथेच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह चंदीगढमध्ये शिफ्ट झाला आणि येथूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. येथील गुरु नानक कॉलेजमधून त्याने बी. कॉमची आणि त्यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन थिएटरमध्ये ही पदवी प्राप्त केली.
जसपाल भट्टी यांना आपला आदर्श मानणा-या सुनीलने सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत चंदीगढ थिएटरमध्ये काम केले. सुनीलने 'चला लल्लन हीरो बनने' या फिल्मी चॅनलवरील शोमध्ये मुव्ही जॉकी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.
2000मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण
सुनीलने बॉलिवूड सुपरस्टार्स आमिर खान आणि अजय देवगण यांच्यासहसुध्दा काम केले. 2000मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या सिनेमात त्याने अजय देवगणसह काम केले. हा त्याला पहिलाच बॉलिवूड सिनेमा होता. मात्र या सिनेमात त्याला दोनच सीन मोठ्या मुश्किलने मिळाले. त्यानंतर सुनील पुन्हा एकदा अजयसह 'द लीजेंड ऑफ भगतसिंह' (2002) मध्ये दिसला. यातही त्याला खूप कमी भूमिका मिळाली.
आमिर खानसोबत 'गजिनी'त झळकला
2008मध्ये आलेल्या 'गजिनी' ब्लॉकब्लस्टरमध्ये सुनीलने आमिर खानसह काम केले होते. या सिनेमात सुनील संपतच्या पात्रात त्याने आसिनच्या मित्राची भूमिका साकारली होती. आमिरची नकल करताना पहिल्यांदा लोकांनी सुनीलला या सिनेमात नोटिस केले होते. मात्र हा सिनेमासुध्दा त्याल हवी तेवढी प्रसिध्दी देऊ शकला नाही.

या सिनेमांमध्ये केला अभिनय
प्यार तो होना ही था (2000)
द लिजेंड ऑफ भगतसिंग (2002)
गजिनी (2008)
जिल्ला गाजियाबाद (2013)
हीरोपंती (2014)
गब्बर इज बॅक (2015)
टीव्ही शोज
क्या आप पांचवी पास है
गुटर गू
कॉमेडी सर्कस
कॉमेडी नाइट्स विथ कपिल
मॅड इन इंडिया
'कॉमेडी नाइट्स विद कपिल' (कलर्स)मध्ये मिळाले 'गुत्थी'चे पात्र
कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' हा शो अजूनही ऑन एअर आहे. या शोमध्ये सुनील ग्रोवरने 'गुत्थी' या स्त्रीचे पात्र साकारले होते. या पात्रातून त्याला लोकप्रिय मिळाली. सुनील ग्रोवर ऐवजी लोक त्याला 'गुत्थी' नावाने ओळखू लागले. मात्र काही मतभेदांमुळे त्याने हा शो सोडला आणि स्वत:चा 'मॅड इन इंडिया' (स्टार प्लस) हा कॉमेडी शो सुरु केला. पण यात त्याला यश आले नाही आणि त्याने कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये कमबॅक केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुनील ग्रोवरची खास छायाचित्रे...