आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलला बुटाचा नंबर सांगतोय सुनील ग्रोवर? इंस्टाग्रामवर केला फोटो पोस्ट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टाग्रामवर सुनीलने हा फोटो पोस्ट केला आहे - Divya Marathi
इंस्टाग्रामवर सुनीलने हा फोटो पोस्ट केला आहे
मुंबई - कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरचा विवाद अजूनही थांबण्याची काही चिन्हे नाहीत. नुकताच सुनील ग्रोवरने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला एक फोटो कपिलसाठीच तर संदेश नाही ना असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 
 
या फोटोमध्ये सुनीलच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे आणि तो टेबलावर पाय ठेवून बसला आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहीले आहे - who sunilgrover Shoe Size US 10. आता या कॅप्शऩचा अर्थ काय हे सुनीललाच माहिती पण या फोटोला कपिल-सुनीलच्या भांडणाशी चाहते जोडू पाहत आहेत. 
 
कपिलवर सुनीलला फ्लाईटदरम्यान बुट मारण्याचा आहे आरोप..
 
झाले असे की, 16 मार्च 2017 रोजी जेव्हा कपिल शर्मा आणि टीम ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतत होते तेव्हा मद्यधुंद अवस्थेत कपिलने त्याच्या टीमसोबत भांडण केले.
 
- प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार, कपिलला त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या अगोदर जेवण केलेले आवडले नाही, त्यावरुन त्याने सर्वांशी भांडण करायला सुरुवात केली.

- यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर न जाण्यासाठी सुनील ग्रोवर कपिलला शांत करण्यासाठी पुढे गेला तेव्हा कपिल त्याच्यावरही भडकला. 

- कपिलने सुनीलला केवळ शिवीगाळच केली नाही तर त्याला बुटानेही मारले.

- या घटनेनंतर सुनील ग्रोवरशिवाय अन्य दोघे म्हणजेच अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनीही शोमध्ये काम करण्यास नकार दिला.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रद्धा-आदित्यच्या शोदरम्यान सेटवर 5 तास उशिरा आला होता कपिल... 
 
 
बातम्या आणखी आहेत...