आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडबाय \'गुत्थी\', वेलकम \'चुटकी\': बघा सुनीलचा \'चुटकी\'च्या अवतारातील खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमधून प्रसिध्द झालेल्या सुनील ग्रोवरला 'गुत्थी' या नावानेच सर्वजण ओळखतात. 'कॉमेडी नाइट्स...'मधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या चाहत्यांना पुन्हा त्याला टीव्हीवर बघण्यासाठी बरीच प्रतिक्षा करावी लागली. परंतु प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे, कारण सुनील ग्रोवर काही दिवसांतच त्याचा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, तो 'गुत्थी'च्या नव्हे तर 'चुटकी'च्या भूमिकेत दिसणार आहे.
सुनीलने 'चुटकी'च्या भूमिकेची सर्व तयारी केली आहे. त्याचा नवीन शो फेब्रुवारीमध्ये टीव्हीवर प्रसारित होणार आहे. अलीकडेच, सुनीलने 'चुटकी' या नवीन भूमिकेचे काही फोटो काढले आहेत.
त्यावेळी सुनील त्याच्या नवीन गेट-अपमध्ये दिसला. पंजाबी ड्रेस घालून पायात बुट घातलेला त्याचा अंदाज आणि हिरव्या रंगाचा चश्मा लावलेला फनी लुक. सोबतच त्याची फनी हेअरस्टाइल म्हणजे, दोन वेण्या देखील त्याने घातल्या होत्या. तसे तर त्याचा हा अवतार 'गुत्थी'ची आठवण करून देणारा होता, परंतु सुनीलच्या सांगण्यानुसार 'चुटकी'ची ओळख पूर्णत: वेगळी आहे.
'चुटकी'च्या शोचे नाव आहे 'मॅन इन इंडिया' आणि हा शो 16 फेब्रुवारीपासून स्टार प्लसवर चॅनलवर प्रसारित होणार आहे. सुनीलचा हा शो रात्री 8.30 वाजता प्रसारित होणार आहे आणि कपिलचा शो 10 वाजता प्रसारित होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सुनीलचा 'चुटकी' अवतार...