कॉमिक 'गुत्थी' अर्थातच अभिनेता सुनील ग्रोवर सध्या त्याच्या नवीन शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा 'मॅन इन इंडिया' शो 16 फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे. परंतु अलीकडेच त्याच्यासोबत एक अपघात घडला आहे. गुरूवारी एका हायवेवर त्याच्या कारचे टायर फुटल्यामुळे त्याची गाडी एका ऑल्टोला धडकली होती. या अपघातात 3 लोक जखमी झाले होते. हा अपघात घडला त्यावेळी सुनीलची आई कारमध्ये बसलेली होती. या अपघातात त्याची आईदेखील जखमी झाली आहे. त्यावेळी अपघातात जे लोक जखमी झाले होते सुनीलने त्यांना त्याच परिस्थित सोडून तिथून निघून गेला होता, म्हणून तो बराच वादात सापडला होता.
अपघाताविषयी माध्यमांसोबत बोलताना सुनीलने सांगितले, 'असा अपघात माझ्यासोबत पहिल्यांदाच घडला असे माझ्या आयुष्यात पुन्हा असे कधीच घडू नये. अपघात झाला होता तेव्हा माझी आई माझ्यासोबत होती. कारचे टायर अचानक फुटले आणि मला काहीच समजले नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या घटनेविषयी अधिक माहिती...