आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Verified Facebook Account Fake, Denies Coming Back To Comedy Nights

\'कॉमेडी..\'मध्ये कमबॅक करणार नाही गुत्थी, जाणून घ्या काय म्हणाली?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'मॅड इन इंडिया' हा शो फ्लॉप ठरल्यानंतर सुनील ग्रोव्हर कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये कमबॅक करणार असल्याच्या बातम्या माध्यमात येत होत्या. सुनीलच्या फेसबूक पेजवर तसे पोस्ट दिसत होते. मात्र विनोदवीर सुनील ग्रोव्हरने ते फेसबूक पेज बनावट असल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे. सुनीलच्या फेक फेसबूक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले होते, ''आमच्यातील सर्व गैरसमज दूर झाले असून पुन्हा एकदा आम्ही स्टेजवर रॉक करणार आहोत... एकत्र.''
याविषयी सुनीलने सांगितले की ही केवळ अफवा आहे. दैनिक भास्करशी बोलताना सुनील सांगितले, ''या सर्व गोष्टींमध्ये तथ्य नाहीये. माझे वेरिफाईड फेसबूक पेज नाहीये.''
कपिल शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसमधील सूत्रांच्या मते, ''होय, आम्हीसुद्धा सुनील ग्रोव्हरचे पोस्ट पाहिले आहे. मात्र ते खरे नाहीये. सध्या तरी सुनील आमच्या शोमध्ये परतणार नाहीये.''
सुनीलने कपिलच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये गुत्थीची भूमिका साकारली होती. हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुनीलने दिग्दर्शकाकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने सुनीलने हा शो सोडला.
सेलिब्रिटींचे सोशल अकाऊंट हॅक होण्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांचे ट्विटर अकाऊंटवरुनदेखील फेक ट्विट समोरे आले होते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या फेसबूक पॉलिसी आणि व्हेरिफाइड अकाऊंटविषयी...