आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी अवतरणार स्मॉल स्क्रिनवर, रिअ‍ॅलिटी शोची होणार होस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'रागिणी एमएमएम 2'च्या यशानंतर अभिनेत्री सनी लिओन आता पुन्हा छोटया पडद्याकडे वळाली आहे. एमटीव्हीवरील 'स्प्लिट्सव्हिला' या रिअ‍ॅलिटी शोच्या सातव्या सिझनसाठी सनी होस्ट म्हणून टीव्हीवर दिसणार आहे.
'स्प्लिट्सव्हिला' हा अमेरिकन डेटिंग रिअ‍ॅलिटी शो ‘फ्लेव्हर ऑफ लव्ह’वर आधारित शो आहे. या शोची 32 वर्षीय सनी होस्ट म्हणून रंगत वाढविणार असून तिने शर्लिन चोप्राची जागा घेतली आहे. शर्लिन आधी या शोची होस्ट म्हणून काम करणार होती. याआधी 'बिग बॉस' या शोमधून सनी छोट्या पडद्यावर दिसली होती. 'स्प्लिट्सव्हिला' शो तरुण मुले आणि मुलींभोवती असून प्रेमासाठी शिकार अशी संकल्पना यामागे आहे. प्रेमाचा शोध हे तरुण विविध स्पर्धांमधून घेतात. विजेत्या तरुण व तरुणीला स्प्लिट्सव्हिलाच्या सिझनचे विजेता म्हणून घोषित करण्यात येते.
सनी या शोचे होस्टिंग करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये निश्चितच उत्सुकता वाढणार आहे. अर्थात या शोमध्ये कोण कोण व कितीजण सहभागी होणार आहेत हे मात्र अद्याप गुपित आहे. सनीच्या 'रागिणी एमएमएस 2'ने आतापर्यंत 39 कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे. अत्यंत बोल्ड सीन्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मूळच्या कॅनडाच्या असलेल्या सनीचा त्यामुळे आता भाव चांगलाच वधारल्याचे दिसत आहे. तिच्यावर चित्रित झालेले 'बेबी डॉल...' हे गाणेदेखील चांगलेच हिट झाले आहे.