आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लीला'मध्ये सनी लिओनसोबत दिसणार जय भानुशाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री सनी लियोन)
प्रौढ विषयावर आधारित असलेल्या 'हेट स्टोरी-2'मध्ये सुरवीन चावलासोबत टीव्ही कलावंत जय भानुशालीने काम केले आहे. आता जयने आणखी एक चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात तो सनी लिओनीसोबत दिसणार आहे. 'लीला' नावाच्या या चित्रपटाची निर्मिती नृत्यदिग्दर्शक अहमद खान करणार आहे, तर त्यांचा भाऊ बॉबी खान दिग्दर्शन करणार आहे. सनी लिओन आणि जय भानुशालीबरोबरच 'पिज्जा' फेम अॅक्टर अक्षय ओबेरॉयची देखील भूमिका आहे.
याबाबत जयने सांगितले की, 'हेट स्टोरी-2 नंतर मला अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आले. टीव्हीवरील माझ्या भूमिका साधारण होत्या. मात्र या चित्रपटाद्वारे माझी हॉट बॉयची प्रतिमा तयार झाली आहे. लीलामध्ये माझी एका गायकाची भूमिका आहे. यामध्ये प्रेक्षकांना माझा वेगळा लूक दिसेल.'
सुरुवातीला ऋचा चढ्ढा आणि हिमांशू सोनीला 'लीला'मध्ये काम करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, सनी लिओनसोबत काम करण्यास त्यांनी नापसंती दर्शवली.