Home »TV Guide» Surbhi Chandna Birthday Special, TV Show Ishqbaaaz

रियल लाइफमध्ये ग्लॅमरस आहे 'इश्कबाज' बहू, दम मारण्यातही नाही मागे, पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 12:39 PM IST

टीव्ही सिरियल 'इश्कबाज'मध्ये अनिकाची भूमिका करणारी सुरभी चांदना 25 वर्षांची (11 सप्टेंबर) झाली आहे. सिरीयलमध्ये ती ओबेरॉय कुटुंबाच्या सुनेची भूमिका करत आहे. टीव्हीवर सुनेची भूमिका करणारी सुरभी रियल लाईफमध्येही अत्यंत ग्लॅमरस आहे. सिगारेट ओढण्यातही पटाईत असलेली सुरभी कॉर्पोरेट प्रोफेशनल करण शर्माला डेट करत असल्याचे समोर आले आहे.

मार्केटिंगमध्ये केले एमबीए
मुंबईत जन्मलेली सुरभी पंजाबी कुटुंबाशी संबंधित आहे. तिने मार्केटींगमध्ये एमबीए केले आहे. तिने करिअरची सुरुवात जाहिरातींपासून केली होती. करिअरच्या सुरुवातीलाच तिला सर्वात आधी 'कुबूल है' मध्ये कामाची ऑफर मिळाली. लहान भूमिका करत असतानाच तिला स्टार प्लसच्या 'इश्कबाज' मालिकेत लीड रोल करण्याची संधी मिळाली. सुरभी सध्या कॉर्पोरेट प्रोफेशनल करण शर्माला डेट करत आहे. तिने तिचे आणि करणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर सुरभी चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

या मालिकांत केले काम...
सुरभीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (2009), 'एक ननंद की खुशियों की चाबी.. मेरी भाभी' (2013), 'कुबूल है' (2015), 'आहट' (2015), 'दिल बोले ओबेरॉय' (2017) मध्ये काम केले आहे. 2014 मध्ये विद्या बालनच्या बॉबी जासूसमध्येही ती झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुरभीचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended