आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surbhi Jyoti Cuts Her Wrist On The Set Of Qabool Hain

शुटिंगदरम्यान या टीव्ही अभिनेत्रीने कापला स्वतःचा हात, जाणून घ्या काय घडले होते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'कुबूल है' या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारणा-या अभिनेत्री सुरभी ज्योती हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ऐकिवात आहे, की शुटिंगदरम्यान सुरभीचा हात कापून गेला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका सीनमध्ये सुरभी आहिल अब्राहम उर्फ करणवीर बोहरावर नाराज होते आणि काचेच्या तुकड्याने स्वतःचा हात कापून घेते.
हा सीन करत असताना सुरभीचा हात खरोखरच कापला गेला आहे. सुदैवाने जखम गंभीर स्वरुपाची नाहीये. शोच्या टीमने तिला तातडीने प्रथमोपचार दिले. हाताला इजा पोहोचल्यानंतर देखील सुरभीने आपला सीन पूर्ण केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इलेक्ट्रॉनिक मीडिया हाऊसच्या कॅमे-यात कैद झाली होती. मात्र ही बातमी पसरावी, अशी सुरभीची इच्छा नव्हती. त्यामुळे सेटबाहेर पडण्यापूर्वीच सुरभीने वाहिनींच्या कॅमे-यातील हे फुटेड डिलीट केले. याविषयी सुरभीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तिने प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

कोण आहे सुरभी ज्योती-
सुरभी ज्योती टीव्ही अभिनेत्री असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र ती एक रंगभूमी कलाकारसुद्धा असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. सुरभी पंजाबी तरुणी आहे. तिचा जन्म जालंधर (पंजाब) मध्ये झाला. टीव्ही आणि रंगभूमीशिवाय सुरभीने पंजाबी सिनेमांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. झीटीव्ही कुबूल है या मालिकेमुळे तिला ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत सुरभी सुरुवातीला जोया फारुखीच्या भूमिकेत दिसली आणि आता ती सनम अहमद खानच्या भूमिकेत दिसत आहे.

रंगभूमीपासून झाली करिअरला सुरुवात -
2007मध्ये सुरभीने रंगभूमीवर आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. त्यावेळी ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यानंतर 2010मध्ये तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. हा एक पंजाबी शो होता आणि त्या शोचे नाव होते 'अंखियां तो दूर जाए न'. 2010-2011 या काळात सुरभीने या शोमध्ये काम केले. 2011मध्ये तिला 'कच दियां वांगा' हा दुसरा पंजाबी शो मिळाला. वर्षभर सुरभी या शोमध्ये झळकली. ऑक्टोबर 2012मध्ये तिला झी टीव्हीवरील 'कुबूल है' या मालिकेत लीड रोल मिळाला.

पंजाबी सिनेमांतही केले काम -
2010मध्ये सुरभीला पहिला पंजाबी सिनेमा मिळाला. या सिनेमाचे नाव होते 'इक कुडी पंजाब दी'. त्यानंतर 2012मध्ये 'मुंडे पटियाले दे' आणि 'रौला पे गया' या पंजाबी सिनेमात सुरभी झळकली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुरभीची खास छायाचित्रे...