आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोच्या सेटवर आजारी पडली 'झोया', तरीदेखील शुटिंग ठेवली चालू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमर आणि एंटरटेनमेंटचे शहर मुंबईमध्ये तापमानाचे प्रमाण वाढल्याने सर्वच नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच, टीव्ही स्टार्स आणि बॉलिवूड स्टार्सनाही असाच काही त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच, झी टीव्हीची लोकप्रिय 'कबूल है' मालिकेची झोया अर्थातच सुरभि ज्योती सेटवर अचानक आजारी पडली. तिचे आजारी पडण्याचे कारण डिहायड्रेशन असल्याचे सांगितले जात आहे.
मालिकेत येँणा-या नवीन टि्वस्टला लक्षात घेऊन याची शुटिंग बाहेर ठेवण्यात आली होती. परंतु मुंबईच्या उच्च तापमानने सुरभिला डिहायड्रेशन झाल्याचे सांगितले जात आहे. ती शुटिंगसाठी खूपच अस्वस्थ दिसत होती. एवढेच नाही तर, शुटिंग दरम्यान तिला दोन-तीन वेळा उलट्यासुध्दा झाल्या.
तिला तिच्या प्रकृतीविषयी विचारले तेव्हा ती म्हणाली, 'हो, मला खरंच खूप त्रास होतोय. परंतु मी या शुटला पुढे ढकलणार नाही. या खास चित्रीकरणासाठी अनेक ज्यूनिअर कलाकारांना बोलवण्यात आले आहेत. जर मी या शुटिंगला पूर्ण केले नाही तर ते माझ्या टीमसाठी फायद्याचे ठरणार नाही. माझ्यासोबत माझे सर्व सहकारी आहेत. ते सर्व माझी काळजी घेत आहेत. मीही त्यांनी पूर्णपण सहकार्य करते.'
आपण आतापर्यंत सेटवर नख-यांविषयी खूप ऐकले आहे, परंतु प्रॉडक्शन टीम आणि ज्यूनिअरच्या कामाची दखल घेणारे लोकसुध्दा या ग्लॅमर जगात आहे असे मानावे लागेल.
कोण आहे सुरभि ज्योती:
सुरभिला झी टीव्हीच्या 'कबूल है' या मालिकेत बघितले गेले आहे. परंतु तिने सिनेमांतसुध्दा काम केले आहे हे कदाचितच कुणाला माहित असेल. तिने पंजाबी सिनेमांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलेली. जालेधर, पंजाबमध्ये जन्मलेल्या सुरभिने 2007मध्ये एक सिनेअभिनेत्री म्हणून करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर ती 'अखिया तो दूर जाए न' या पंजाबी टीव्ही शोमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने 'एक कुडी पंजाब दी' आणि 'मुंडे पटियाले दे' या सिनेमांमध्ये काम केले आहे. 2012मध्ये तिने पहिल्यांदा 'रौला पे गया' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. त्याचवर्षी तिला 'कबूल है' मालिकेची ऑफर मिळाली होती. ती सध्या या मालिकेत झोया फारुखी नावाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा बघा सुरभिचे खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे...