आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्हीच्या कृष्णाने 10 वर्षांच्या डेटिंगनंतर गर्लफ्रेंडसोबत बांधली साताजन्माची गाठ, Wedding Album..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौरभ पांडेने त्याची लाँगटाइमची गर्लफ्रेंड जारा सोनीसोबत 28 नोव्हेंबरला लग्न केले. लग्नानंतर सौरभने जाराला असे किस करुन दिल्या शुभेच्छा. - Divya Marathi
सौरभ पांडेने त्याची लाँगटाइमची गर्लफ्रेंड जारा सोनीसोबत 28 नोव्हेंबरला लग्न केले. लग्नानंतर सौरभने जाराला असे किस करुन दिल्या शुभेच्छा.

मुंबई - टीव्ही सीरियल 'सूर्यपूत्र कर्ण' मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अॅक्टर सौरभ पांडे याने 28 नोव्हेंबरला त्याची गर्लफ्रेंड जारा सोनीसोबत लग्न केले. या दोघांचे वेडिंग फोटोज समोर आले आहे. यामध्ये जारा रेड अँड स्लिव्हर कलरच्या लहेंग्यामध्ये दिसते तर सौरभने व्हाइट अँड रेड कलरची शेरवानी घातलेली आहे. यामध्ये ही जोडी सुंदर दिसत होती. 

 

लग्नाच्या दोन दिवस आधी केली एंगेजमेंट...
- सौरभ आणि जारा यांनी लग्नाच्या दोन दिवस आगोदर म्हणजेच 26 नोव्हेंबरला साखरपूडा केला होता. 
- साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी मेहंदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दोघांच्या फॅमिलीचे काही निवडक मेंबर्स सहभागी झाले होते. 
- सौरभ-जाराच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याचा बेस्ट फ्रेंड आणि टीव्ही अॅक्टर गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबीना बॅनर्जी उपस्थित होती. 

 

सौरभने लग्नात जोरदार केला डान्स 
- सौरभ-जाराच्या लग्नाचे फोटो समोर आले आहे, त्यामध्ये वर सौरभ जोरदार डान्स करताना दिसतो. 
- सौरभने DivyaMarathi.Com ला सांगितले की त्याची लेडी लव्ह कॅनडाची आहे. तिच्या कुटुंबातील सर्वजण या लग्नाच्या प्रत्येक सोहळ्याला उपस्थित होते आणि डान्स देखील केला. 
- सौरभने सांगितले की आम्हाला डेटिंग करुन आता 10 वर्षे होत आहेत. यानंतर आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

 

ड्रग अॅडिक्ट होता सौरभ 
- 2007 मध्ये 'जिया जले' या शोमधून टीव्ही करिअरला सुरुवात करणाऱ्या सौरभबद्दल फार कमी लोकांना माहित आहे, की तो पूर्वी ड्रग अॅडिक्ट होता. 
- सौरभने स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये याचा खुलासा केला होता. सौरभने नशेची ही लत फार प्रयत्नपूर्वक सोडली आहे. 2010 मध्ये जेव्हा तो टीव्ही शो तेरे मेरे सपने मध्ये काम करत होता, तेव्हाच त्याला ड्रग्जची सवय लागली होती. 
- सौरभने सांगितले, की तेव्हा मला ओळखणाऱ्यांना वाटत होते की याच्याकडे सर्वच आहे. याला कशाचीच कमी नाही, मात्र तेव्हा मी एकटेपणाने वैतागलो होतो. 
- मी सेटवरच खूप स्मोकिंग आणि ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा माझ्या पॅरेंट्सनी मला या यातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांना माझी फार चिंता वाटत होती.  
- हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. माझ्यामुळे संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती. अखेर यातून मी बाहेर आलो आणि सर्वकाही सुरळीत सुरु झाले. तब्बल एक वर्षानंतर मी विळख्यातून बाहेर आलो होतो. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सौरभ पांडेचा Wedding Album...

बातम्या आणखी आहेत...