आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत-अंकिताने घेतला लग्नाचा निर्णय, पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये चढणार बोहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे)
मुंबईः टीव्हीची प्रसिद्ध जोडी सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेने लग्नाचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच एका पार्टीत सुशांतला लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिले, पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी अंकितासोबत लग्नाचा निर्णय घेतला आहे. मात्र नेहमीप्रमाणे त्याने लग्नाची निश्चित तारीख सांगितली नाही.
सुशांत आणि अंकिता गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या दोन्ही कलाकारांनी आपल्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिलेत. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर कधीही झाला नाही.
अंकिता एक टीव्ही अभिनेत्री असून झी टीव्हीच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेत ती लीड रोलमध्ये झळकली होती. तर सुशांतने 'किस देश में है मेरा दिल' (2008-09) आणि 'पवित्र रिश्ता' (2009-11) या मालिकांमध्ये काम केले. याशिवाय त्याने बॉलिवूडमध्येही स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 'काई पो छे'(2013) आणि 'शुद्ध देशी रोमांस'(2013), 'PK' आणि 'डिटेक्टिव ब्योकेश बख्शी' या सिनेमांमध्ये सुशांत झळकला आहे. आता तो 'एम एस धोनी' या आगामी सिनेमावर काम करतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सुशांत आणि अंकिताचे फन मोमेंट्स...