(अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत)
मुंबईः अंकिता लोखंडेची मुख्य भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अलीकडेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. शेवटच्या एपिसोडमध्ये सुशांत सिंह राजपूतने गेस्ट अपिअरन्स शूट केला. या मालिकेद्वारेच सुशांतने
आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून शेवटचा एपिसोड साजरा केला.
यावेळी divyamarathi.comशी बोलताना सुशांत म्हणाला, 'ही मालिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या मालिकेने मला खूप काही दिले. प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. मालिकेची संपूर्ण टीम मला माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. याच सेटवर मला माझ्या आयुष्याचा जोडीदार गवसला. मी पुन्हा एकदा मालिकेत मानवची भूमिका साकारली. मालिकेतून परतून आनंद होतोय.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पवित्र रिश्ता'च्या शेवटच्या एपिसोडवेळी क्लिक झालेली सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेसह इतर स्टारकास्टची छायाचित्रे...