आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput, Ankita’S Marriage Cancelled

सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे अडकणार नाहीत लग्नाच्या बेडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे पुन्हा एकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. बातमी अशी आहे, की 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या या जोडीच्या नात्याचा परिणाम सुशांतच्या स्टाइलिश करिअरवर पडत असल्याने या दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत आणि अंकिता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहत आहेत. त्यांचा साखरपुडादेखील झाला आहे. परंतु दोघांनी आता लग्न करण्यास नकार दिला आहे. यापूर्वी ही जोडी लग्नासाठी खूप उत्साही होती. परंतु आता दोघांनीही हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सुशांतला त्याच्या दिर्घकाळच्या या अफेअरविषयी विचारले असता तो म्हणाला, 'आम्ही आजही खूप आनंदी आहोत. माझ्या मते लग्न कधीही केले जाऊ शकते...ते या वर्षीही होऊ शकते आणि पुढील वर्षीही होऊ शकते.' बातम्यांनुसार, सुशांतने याविषयामुळे यशराज फिल्म्सच्या स्टुडिओ बाहेर अंकिताच्या कानशिलात लगावली होती.
सुशांतने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तो त्याच्या कामापेक्षा त्याच्या अफेअरसाठी चर्चेत राहिला आहे. अशाही अफवा होती, की या जोडीने मागील वर्षी उज्जैनमध्ये लग्न केले आहे. त्यादरम्यान अंकिताच्या आई-वडील उज्जैनमधून इंदौरला स्थायिक झाले होते. अंकितालाही मनोरंजन जगात करिअर करायचे आहे, पुरंतु तिच्या आई-वडीलांना ते मान्य नाहीये.
5 वर्षांपासून सुशांत-अंकिता करत होते डेटिंग आणि एप्रिलमध्ये करणार होते लग्न, पुढील स्लाइड्सवर वाचा...