आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'CID'च्या सेटवर पोहोचला सुशांत, '..ब्योमकेश बख्शी'चे केले प्रमोशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('CID'च्या टीमसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या आपल्या आगामी 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचनिमित्ताने तो अलीकडेच छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या सीआयडीच्या सेटवर पोहोचला. या शोमध्ये सुशांत 'सीआयडी'च्या टीमसोबत मिळून एक मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसेल.
यावेळी मीडियाशी बोलताना सुशांत म्हणाला, की त्याची टीव्ही आणि बॉलिवूड अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. कारण दोन्ही माध्यमांचे स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे.
दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. सिनेमात सुशांतसोबत स्वस्तिका मुखर्जी, दिव्या मेनन आणि मयांग चांग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'सीआयडी'च्या सेटवर क्लिक झालेली सुशांतची खास छायाचित्रे..
बातम्या आणखी आहेत...