आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर पोहोचली सुश्मिता, PICSमध्ये पाहा बिनधास्त अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन अलीकडेच 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर पोहोचली होती. कपिलच्या या कॉमेडी शोमध्ये सेलिब्रिटी सहसा सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने येत असतात. मात्र सुश्मिताकडे सिनेमाच्या प्रमोशनचे कारण नव्हते. एका दिवसापूर्वीच बातमी आली होती, की आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शेवटच्या क्षणी शोमध्ये येण्यास नकार दिल्यानंतर सुश्मिताला शोमध्ये आमंत्रित करण्यात आले. हा निर्णय शोच्या क्रिएटिव्ह टीमने घेतला होता.
केजरीवाल यांना दिल्लीत झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी शोमध्ये सहभागी होण्यास नकार कळवला.
असो, सुश्मिताने कपिलचे निमंत्रण स्वीकारले आणि ती शोमध्ये सहभागी झाली. सुश्मिता बिनधास्त अंदाजात सेटवर पोहोचली होती. यावेळी कपिलची ऑनस्क्रिन पत्नी, नोकर यांच्यासोबतची तिची जुगलबंदी बघण्यासारखी होती. याशिवाय सुश्मिताने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर पोहोचलेल्या सुश्मिताचा बिनधास्त अंदाज...