आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushmita, Sonu & Many TV Celebs Walk The Red Carpet Of Sab Ke Anokhe Awards 2015

अवॉर्ड नाइटमध्ये थिरकले \'जेठा-दया\', सुश्मितासह पोहोचले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिलीप जोशी, दिशा वाकाणी, शेखर सुमन, सुश्मिता सेन आणि सोनू सूद)
मुंबईः दरवर्षीप्रमाणे यंदाही सब वाहिनीच्या वतीने 'सब के अनोखे अवॉर्ड्स 2015' या अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसोबतच बॉलिवूडकरांनीही आपल्या ग्लॅमरचा तडका लावला. गुरुवारी मुंबईतील फिल्मसिटीत आयोजित या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे लीड अॅक्टर्स दिलीप जोशी (जेठा लाल) आणि दिशा वाकाणी (दया बेन) डान्स करताना दिसले. याशिवाय लवकरच सब वाहिनीवर सुरु होणा-या एका कॉमेडी शोचे जज अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री सुश्मिता सेनसुद्धा रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी सुश्मिता डिझायनर शांतनू आणि निखिल यांनी डिझाइन केलेला कोबाल्ट ब्लू गाऊन कॅरी केला होता.
गुरुवारी रात्री आयोजित या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्री तनाज ईराणी, जिया माणिक, असित मोदी, सुमित राघवन, बख्तियार ईराणी, शेखर सुमन, दीपशिखा नागपाल, सौम्या टंडन, राहुल महाजन, विशाल सिंहसह बरेच टीव्ही स्टार्स पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'सब के अनोखे अवॉर्ड्स 2015' सोहळ्यात पोहोचलेल्या ग्लॅमरस स्टार्सची खास झलक...